Skip to main content
Install App
If you're using:

होमस्कूलिंग टिप्स – तुमच्या मुलाच्या विशेष गरजांसाठी खास शैक्षणिक मार्गदर्शन

Default Avatar

Nayi Disha Team

Also available in: English

Key Takeaways:

  1. होमस्कूलिंग म्हणजे काय?
  2. होमस्कूलिंगचा निर्णय घेतल्यानंतर कशाची तयारी करावी लागते.
  3. होमस्कूलिंग दरम्यान मुलाला आवश्यक पाठिंबा देतात.
  4. होमस्कूलिंगचे वेगवेगळे मार्ग समजून घेणे
  5. वेगवेगळ्या होमस्कूलिंग शैलींचे फायदे आणि तोटे काय आहे?
  6. होमस्कूलिंग वेळापत्रक कसे तयार करावे?
  7. मुलाला जीवन कौशल्ये शिकवण्यासाठी आवश्यक काही महत्वाच्या गैर-अकॅडेमिक कौशल्ये काय आहे?

होमस्कूलिंग म्हणजे काय?

होमस्कूलिंग म्हणजे मुलांचे शिक्षण शाळेबाहेर घरच्या वातावरणात देणे. भारतात होमस्कूलिंग करणाऱ्या मुलांची संख्या सतत वाढत आहे.
काही अहवालांनुसार, मागील काही वर्षांत ही संख्या दरवर्षी २% वरून ८% पर्यंत वाढली आहे.

होमस्कूलिंग सुरू करण्यापूर्वी स्वतःला विचारावेत असे प्रश्न

  • पालक म्हणून तुम्हाला शिक्षणाद्वारे काय साध्य करायचे आहे?
  • मुलांच्या क्षमतेनुसार शैक्षणिक उद्दिष्टे कशी ठरवू शकता?
  • प्रमाणपत्र (certificate) मुलाच्या प्रगतीचे मूल्यांकन व दर्शवेल का?
  • होमस्कूलिंग दरम्यान सपोर्ट सिस्टम तयार आहे का?
  • जर तुम्ही होमस्कूलिंग चालवू शकणार नसाल, तर मुलाच्या शिक्षणासाठी बॅकअप योजना आहे का?

मजबूत सपोर्ट सिस्टम असणे आवश्यक आहे

होमस्कूलिंग सुरू करण्यापूर्वी मजबूत पाठिंबा प्रणाली असणे खूप महत्वाचे आहे:

  1. कुटुंबातील सदस्य
  2. सामाजिक सर्कल
  3. इतर पालक किंवा तुमचे peers
  4. मुलांचे मित्र आणि सहकारी
  5. थेरपिस्ट्स किंवा विशेष शिक्षकांचा आरोग्य व्यवस्थापन संघ

होमस्कूलिंग आमच्यासाठी योग्य आहे का?

होमस्कूलिंग कोणत्याही वयात सुरू करता येते. मुल आधी शाळेत असले तरीही, तुम्ही होमस्कूलिंगकडे स्विच करू शकता. होमस्कूलिंगचा विचार सुरू करताना, मुलाच्या क्षमता आणि गरजांचे मूल्यांकन करणे अत्यावश्यक आहे. यामुळे तुम्हाला मुलासाठी योग्य आणि प्रभावी योजना तयार करता येईल.

मुलाचे मूल्यांकन कसे करावे 

होमस्कूलिंग सुरू करण्यापूर्वी, मुलाची सध्याची स्थिती ओळखणे आणि त्यानुसार योजना तयार करणे अत्यंत महत्वाचे आहे. मुलाच्या विविध विकासात्मक क्षेत्रांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे:

  1. Milestones (विकास टप्पे):
    मुलाचा शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास कसा चालला आहे, याचा आढावा घ्या.
  2. Cognitive Skills (ज्ञानसंबंधी कौशल्ये):
    वाचन, समजून घेणे आणि संकल्पना शिकण्याची क्षमता.
  3. Motor Skills (चाल-लेखन कौशल्ये):
    मुलाचे लेखन, हाताळणी व सूक्ष्म हालचाल कौशल्य


    संवेदनशीलता (sensory sensitivities), संवाद कौशल्य (communication difficulties), सामाजिक, भावनिक व मानसिक विकासातील चिंता जर मुलाच्या गरजा समजायला अवघड जात असतील, तर समान परिस्थितीत असलेल्या इतर पालकांशी संपर्क साधणे उपयुक्त ठरू शकते.

टीप: मुलाला कोणत्याही पूर्वनिर्धारित वेळापत्रकात जुळवण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी, मुलाच्या क्षमतेस आणि गरजेनुसार योग्य वेळापत्रक तयार करा.

होमस्कूलिंग सुरू केल्यावर पुढील महत्त्वाचा विचार: मुलाला Grade 10 किंवा Grade 12 साठी प्रमाणपत्र मिळवायचे आहे का? मुलाची पर्याप्त बौद्धिक क्षमता परीक्षा बसून उत्तरे देण्याची आहे का?


तुमच्या निर्णयावर पुढील योजना अवलंबून राहते:

होमस्कूलिंगचे प्रकार

(A) Certificate Academic Homeschooling

सर्टिफिकेट अकॅडेमिक होमस्कूलिंगमध्ये मुलाला एकतर मुख्य प्रवाहातील अभ्यासक्रमाशी संलग्न होता येते किंवा प्रमाणपत्र परीक्षा देता येतात. या पद्धतीत मुलाचे अधिकृतपणे होमस्कूलिंग झाले तरी त्यांना बोर्डअंतर्गत शिकणाऱ्या इतर मुलांप्रमाणेच तेच शैक्षणिक प्रमाणपत्र मिळू शकते.

(B) Independent Academic Homeschooling (स्वतंत्र अकॅडेमिक होमस्कूलिंग:)


मुख्य प्रवाहातील अभ्यासक्रम वापरून मुलाला विषय शिकवता येतात, पण कोणतेही अधिकृत प्रमाणपत्र न घेता. पालक आपल्या मुलासाठी हवे ते विशिष्ट विषय आणि संकल्पना निवडू शकतात.

(C) Non-Academic Homeschooling (नॉन-अकॅडेमिक होमस्कूलिंग:)

या पद्धतीत मुलांना शालेय विषयांपेक्षा जीवनकौशल्ये (life skills) शिकवली जातात, जेणेकरून ते भविष्यात शक्य तितके स्वतंत्रपणे जगू शकतील.

चांगले होमस्कूलिंग वेळापत्रक तेच जे सर्वांगीण (holistic) असते.
तुमच्या मुलासाठी शिकण्याचे वेळापत्रक तयार करताना काही मुख्य क्षेत्रांवर लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

  • अनुकरण कौशल्ये (Imitation Skills):  यामुळे मुलाला आजूबाजूच्या वातावरणातून स्वतः शिकण्यास मदत होते. यामध्ये वस्तूंचे अनुकरण, आवाजाचे/शब्दांचे अनुकरण, चित्र काढून अनुकरण अशा गोष्टी येतात.
  • संज्ञान कौशल्ये (Cognitive Skills): ही कौशल्ये मुलाला शिकणे, समजून घेणे व आकलन करण्यासाठी उपयोगी ठरतात. उदाहरणार्थ—
    वैशिष्ट्य किंवा कार्यानुसार वर्गीकरण कसे करावे, वस्तू जुळवणे, तसेच रोजच्या जीवनातील संकल्पना जसे लहान/मोठे, कोरडे/ओले, कमी/जास्त, भरले/रिकामे इत्यादी.
  • लक्ष देण्याची कौशल्ये (Attending Skills):  ही कौशल्ये मुलाला फोकस ठेवणे व सूचनांचे पालन करणे शिकवतात. उदाहरण—खुर्चीत स्वतंत्र बसणे, आपली पाळी येईपर्यंत थांबणे.
  • ग्रॉस मोटर कौशल्ये (Gross Motor Skills):  मोठ्या स्नायूंच्या समन्वयासाठी उपयुक्त. शरीर जाणीव, संतुलन व तोल यासाठी महत्त्वाची. लक्ष्यावर चेंडू फेकणे, चेंडू पकडणे अशा उपक्रमांसाठी उपयोगी.
  • फाईन मोटर कौशल्ये (Fine Motor Skills):  पकड, लिहिणे किंवा वस्तू घट्ट धरून ठेवणे अशा क्रियांसाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करतात.

या सर्व विकास गरजांवर काम करणारे उपक्रम वेळापत्रकात घेतल्यास मुलाचा पूर्ण व सर्व बाजूंनी विकास सुनिश्चित होतो. हा लेख प्रामुख्याने स्वतंत्र अकॅडेमिक होमस्कूलिंगबद्दल माहिती देतो. यामध्ये खालील प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे:

  • माझ्या मुलाला कोणते विषय शिकवावेत?
  • आरोग्यदायी शैक्षणिक दिनचर्या कशी तयार करू?
  • कोणते नॉन-अकॅडेमिक उपक्रम दिनचर्येत घेऊ शकतो?

सर्टिफिकेट अकॅडेमिक होमस्कूलिंगबद्दल अधिक माहितीसाठी कृपया “तुमच्या मुलाच्या विशेष गरजांसाठी विशेषीकृत शाळा – NIOS बोर्ड” हा लेख वाचा (हायपरलिंक करावा).

होमस्कूलिंगसाठी पायरी-पायरीने मार्गदर्शक

पायरी 1: अभ्यासक्रम निवडा व डाउनलोड करा:
भारतात अनेक बोर्ड उपलब्ध आहेत—ICSE, CBSE, NIOS किंवा तुमचा राज्य बोर्ड. तुमच्या मुलाच्या गरजांना जे सर्वात योग्य आहे तो अभ्यासक्रम निवडा.

पायरी 2: विषयांची निवड करा:
तुमच्या मुलाला शिकायचे असलेले विषय ठरवा आणि तुम्हाला शिकवायचा अभ्यासक्रम त्यानुसार तयार करा.

पायरी 3: अध्ययन साहित्य शोधा:
हे साहित्य संबंधित बोर्डाच्या वेबसाइटवर मिळू शकते. याशिवाय पुस्तक दुकानांना भेट देऊन अभ्यासक्रम कव्हर करणारी आणि मुलाच्या शिकण्याच्या पद्धतीला अनुरूप पुस्तके घ्या. इंटरनेटवरील उपयुक्त शैक्षणिक साधनांचाही वापर करा. पझल्स, मेमरी गेम्स वापरून शिकणे मजेशीर बनवा.

पायरी 4: वेळापत्रक तयार करा:
मासिक योजना बनवा, उपक्रमांचे नियोजन करा, दिवस वेगवेगळ्या कालखंडात विभागा, मध्ये ब्रेक ठेवा आणि ते सर्जनशील रीतीने हाताळा. व्हिज्युअल एड्सचा वापर करा.

पायरी 5: सर्जनशील चाचण्या घ्या:
चाचण्यांसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरता येतात किंवा नवीन चाचण्या तयार/उपलब्ध चाचण्या वापरा. मुलाला ज्या पद्धतीने सोयीचे वाटते त्या रीतीने उत्तर देऊ द्या—तोंडी किंवा लेखी.

पायरी 6: नोंद ठेवणे (Record Keeping):
मुलाची प्रगती आणि ज्या क्षेत्रांवर अधिक काम हवे आहे त्याची नोंद ठेवा. यावरून पुढील महिन्याचे अध्ययन नियोजन करता येईल.

पायरी 7: नॉन-अकॅडेमिक शिक्षण:
मजा करायला विसरू नका. दिवसभर अभ्यास कंटाळवाणा होऊ शकतो, म्हणून खालील उपक्रम महत्त्वाचे आहेत:

  • हालचाल, शारीरिक तंदुरुस्ती, संगीत किंवा कलेवर आधारित उपक्रम
  • रोजच्या जीवनातील कौशल्ये—स्व-काळजी, स्वयंपाक, फाईन मोटर वाढवणारे उपक्रम
  • सामान्यीकरण (Generalization): शिकलेले ज्ञान वेगवेगळ्या प्रसंगात वापरणे—उदा. पैशांच्या संकल्पना दुकानात/रेस्टॉरंटमध्ये
  • Turn Taking: समूह उपक्रमात आपली पाळी येईपर्यंत थांबणे
  • सामाजीकरण: मुलाला घराबाहेर नेऊन सामाजिक प्रसंग अनुभवू देणे
  • सामाजिक कौशल्य विकास—भावना समजणे, फ्लॅश कार्ड्सद्वारे संवाद, डॉक्टरांकडे किंवा कार्यक्रमात काय स्वीकारार्ह आहे हे शिकवणे
  • संवाद: फक्त वाचन-लेखनासाठी नव्हे तर लोकांशी संवादासाठी. न बोलणाऱ्या मुलांसाठी AAC किंवा PECS सारख्या पर्यायी साधनांचा वापर प्रोत्साहित करा
  • सातत्य (Consistency): कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेण्याचा सराव व दिनचर्येतील बदल स्वीकारणे

पालकांनी मुलाच्या गरजांनुसार विविध शिकवण्याच्या रणनीती स्वीकारणे आवश्यक आहे. प्रत्येक मूल वेगळे असते—म्हणून ते आपल्या शिकवण्याच्या पद्धतीने शिकत नसतील तर आपण त्यांच्या शिकण्याच्या पद्धतीने शिकवले पाहिजे.

आभार 

आमच्या समर्पित पालक चॅम्पियन टीम—अपर्णा श्रीनिवास, KS लावण्या, त्रिवेणी गोस्वामी, प्रीती दीक्षित, PH आचार्य आणि पूजा मेहता—यांचे मनःपूर्वक आभार.
तसेच अनिता नारायण अय्यर (डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन कन्सल्टंट, संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त – एकांश ट्रस्ट) यांचे मौल्यवान मार्गदर्शन, वेळ आणि परिश्रम याबद्दल विशेष आभार.

जर तुम्हाला या विषयावर व संबंधित क्षेत्रांवर अधिक माहिती हवी असेल तर नई दिशा ‘Know Your Rights (KYR)’ कार्यक्रम तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मदत करेल. यात सहभागी झाल्यास तुम्हाला मिळेल:

  • शासकीय योजना समजून घेणे
  • आर्थिक मदत पर्यायांची माहिती
  • कायदेशीर हक्कांचे मार्गदर्शन
  • मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त साधने

अधिक माहितीसाठी: चॅटबॉट: https://bit.ly/4dJVCP3 किंवा हेल्पलाईन क्रमांक 844-844-8996 वर ‘KYR’ टाईप करा

अस्वीकरण

ही मार्गदर्शिका फक्त माहितीपुरती आहे. व्यावसायिक समुपदेशन, वैद्यकीय मदत किंवा वैयक्तिक सल्ल्यासाठी कृपया पात्र तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Write Blog

Share your experiences with others like you!

English