Skip to main content

मुलांमध्ये थांबण्याची आणि आपला नंबर येईपर्यंत प्रतीक्षा करण्याची क्षमता विकसित करणे”

Default Avatar
Nayi Disha Team
Also available in: हिंदी English
Like Icon 0Likes

Key Takeaways:

  1. पाल्यांमध्ये आपला नंबर येण्याची” सवय खेळत खेळत आणि गमतीशीर पद्धतीने विकसित होते , नियम लावून नाही.
  2. गोष्टी सांगणे, खेळ खेळणे आणि मजेदार अ‍ॅक्टिव्हिटीज करताना त्यांना थोडं थांबण्याची सवय लागते
  3. लहान लहान गोष्टी वाचल्यामुळे संयम आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते.
  4. जेव्हा मूल थांबण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा त्याचं कौतुक करा, ही गोष्ट त्यांच्या मनात सकारात्मक रुजते.
  5. व्हिज्युअल शेड्यूल (चित्रांच्या सहाय्याने दिनक्रम दाखवणं) आणि टायमर वापरल्यामुळे त्यांना काय अपेक्षित आहे, हे समजतं.
  6. त्यांच्या पद्धतीने, हळूहळू, पण सातत्याने मार्गदर्शन केल्यास, मुलं थांबण्याच्या प्रक्रियेत अधिक सहभागी राहतात.


मुलांना वाट पाहणे आणि आपला नंबर येण्याची सवय घेणे शिकवताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

  •  वाट पाहणे आणि वळण घेणे ही सामाजिक संवादासाठी मूलभूत कौशल्ये आहेत.
  • यामुळे मुलांना इतरांसोबत संवाद साधणं, खेळणं आणि रोजच्या कृती सोप्या होतात.

 ऑटिझम असलेल्या मुलांसाठी

  • ही कौशल्यं शिकण्यासाठी थोडा अधिक वेळ लागू शकतो.
  • परंतु योग्य समज, संयम आणि पाठिंब्याने ही सवय लावता येते.

 हे लक्षात ठेवा:

  • हा प्रवास म्हणजे मुलांना बदलायला लावणे नाही, तर त्यांच्यासोबत चालत त्यांना योग्य मार्ग दाखवणे आहे.

प्रत्येक मुलाचे अनुभव वेगळे असतात – त्यांच्या वेगळेपणाला समजून घेतल्यास अधिक परिणामकारक मदत करता येते.

मुलांना ‘थांबणे’ आणि आपला नंबर येण्याची सवय घेणे शिकवण्यासाठी काही उपयुक्त उपाय:

योग्य मार्गदर्शन दिल्यास, ऑटिझम असलेली मुलेही ‘थांबणे’ आणि ‘पाळीपाळी ने खेळणे’ शिकू शकतात. ही प्रक्रिया मुलांसाठी सोपी आणि आनंददायक कशी होईल, यासाठी काही सोपे उपाय पुढे दिले आहेत:

1. पाळी ने खेळ होणाऱ्या अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी करून घ्या
मुलांना पाळी ने वागणे शिकवण्यासाठी एक प्रभावी मार्ग म्हणजे रचना असलेल्या खेळांमध्ये त्यांना सहभागी करणे.
जसे की बोर्ड गेम्स, कार्ड गेम्स, किंवा ग्रुपमध्ये गोष्टी सांगण्याचे खेळ – हे सर्व खेळ मुलांना順ळीची वाट पाहायला आणि इतरांबरोबर आनंदाने संवाद साधायला शिकवतात. या प्रकारचे खेळ मजेशीर असतात आणि त्यातून शिकताना तणाव जाणवत नाही.

उदाहरण म्हणून, “Simon Says” (सायमन सेज) हा खेळ वापरता येतो. या खेळातून मुले फक्त नंबर येण्याची वाट पाहणेच शिकत नाहीत, तर सूचनांचं पालन कसं करायचं, लक्ष कसं द्यायचं, आणि खेळामध्ये रस कसा ठेवायचा हेही शिकतात.

2. पुस्तकांच्या माध्यमातून ‘थांबणे’ शिकवा
पुस्तक थोडं थोडं वाचून दाखवणं मुलांना ‘कुतूहल’ आणि ‘थांबणं’ शिकवण्यासाठी उपयुक्त ठरतं.
एखादं पुस्तक एकदम न वाचता, दरवेळी एक पान किंवा थोडं वाचून थांबा. मग मुलाला विचारू शकता, “आता पुढे काय होईल?” – यामुळे मुलाच्या मनात पुढील गोष्टींबद्दल उत्सुकता निर्माण होते.अशा प्रकारे थांबण्याचा अनुभव मुलांसाठी आनंददायक आणि सकारात्मक बनतो. हळूहळू, यामुळे त्यांच्या संयम आणि भावनिक नियंत्रणातही सुधारणा होते.

3. लहान यशांचं कौतुक करा आणि सकारात्मक प्रतिसाद द्या.
मुलांसाठी थांबणं हा अनुभव आनंददायक बनवणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादं मूल छोटं यश मिळवतं – जसं की खेळताना पाळीने आपली वेळ येईपर्यंत शांत बसणं – तेव्हा त्याचं लगेच कौतुक करा.उदाहरणार्थ, “वा! तू किती छान थांबला/थांबलीस!” किंवा “तुझं संयम राखणं खूप छान वाटलं!” असं म्हणणं मुलाला प्रेरणा देतं. सकारात्मक प्रतिसादामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते ही चांगली वागणूक पुन्हा पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतात.

4. दृश्य वेळापत्रक (Visual Schedules) आणि टायमर वापरून रचना द्या.
ऑटिझम असलेल्या मुलांना अशी जागा हवी असते जिथे काय अपेक्षित आहे ते स्पष्ट आणि ठरलेलं असतं. दृश्य वेळापत्रक किंवा टायमर वापरणं हे थांबण्याची आणि पाळीची वाट पाहण्याची कल्पना समजावून सांगण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं. दृश्य चिन्हांमुळे मुलांना काय होणार आहे, कुठल्या क्रमाने होणार आहे, आणि त्यांचा नंबर कधी येणार येणार हे समजतं,  त्यामुळे त्यांची चिंता आणि गोंधळ कमी होतो.

उदाहरणार्थ, जर आपण टायमर लावून दाखवलं की “पाच मिनिटांनी तुझा नंबर  येईल,” तर मूल वेळेचं दृश्य रूप पाहून थोडं शांत राहतं आणि त्यांना अधिक नियंत्रणात वाटतं.

ठरलेली रोजची कामे , सकारात्मक कौतुक, दृश्य वेळापत्रक आणि रोजचा सराव यांचा एकत्रित वापर केल्यास, ऑटिझम असलेली मुलं हळूहळू थांबणं आणिनंबर येण्याची  वाट पाहणं शिकतात.या सवयी मुलांना केवळ सामाजिक व्यवहारांमध्येच मदत करत नाहीत, तर त्यांचा संयम वाढतो, स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची सवय लागते, आणि सहकार्य करायला शिकतात. या सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात खूप उपयोगी ठरतात.

प्रत्येक मूल वेगळं असतं – त्यामुळे त्यांच्या गरजा, पसंती आणि संवेदनशीलतेनुसार वैयक्तिक योजना तयार करणं खूप गरजेचं आहे.
समजूतदारपणा, संयम, आणि सकारात्मक अनुभव देण्याची आपली तयारी – हे सगळं मिळून या मुलांना आवश्यक सामाजिक कौशल्यं शिकण्यास मदत करतं, आणि त्यांच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना आधार मिळतो.

वरील इन्फोग्राफिकमध्ये अशा आणखी काही उपयोगी उपाय सांगितले आहेत. तसंच, ऑटिझम असलेल्या मुलांमध्ये प्रेरणा वाढवण्यासाठी वापरता येणाऱ्या काही उपायांचं इन्फोग्राफिकही तुम्हाला उपयुक्त ठरेल.

कृतज्ञता: या इन्फोग्राफिकसाठी योगदान दिल्याबद्दल आम्ही रेणु के. मनीष यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

तुमच्याकडे ऑटिझम, डाऊन सिंड्रोम, ADHD किंवा इतर developmental differences विषयी काही प्रश्न असतील तर, ‘नई दिशा’ ची टीम तुमच्यासाठी येथे आहे.आमच्या फ्री हेल्पलाईनवर 844-844-8996 वर कॉल किंवा WhatsApp करा.
आमचे समुपदेशक इंग्रजी, हिंदी, मल्याळम, गुजराती, मराठी, तेलुगू आणि बंगाली भाषांमध्ये बोलतात.

Tags:
Write Blog

Share your experiences with others like you!

No Related Resources Found.

No Related Services Found.
English