Skip to main content

 स्वमग्न मुलांचं जग

YogitaJoshi_SpecialEducator

Ms.Yogita Joshi

Like Icon 1Likes

Key Takeaways:

“वाट वळणाची” या पॉडकास्ट सिरिज मध्ये योगिता जोशी यांनी ऑटिझमच्या विविध पैलूंबद्दल विस्तृत चर्चा केली आहे. त्यांनी आपल्या माहितीतल्या लोकांमधे ऑटिझमबद्दलची जागरुकता तपासली आहे आणि त्यानुसार या पॉडकास्टमध्ये खालील मुद्द्यांवर माहिती दिली आहे,

चला तर या पॉडकास्ट च्या माध्यमातून आपण आपल्यातली जागरुकता वाढवूयात

सर्वात प्रथम ऑटिझम म्हणजे काय? 

ऑटिझम एक विकासात्मक वेगळेपण आहे, स्वमग्नता असेही त्याला संबोधले जाते. ज्यामध्ये व्यक्तींच्या सामाजिक संवाद कौशल्यांमध्ये आणि वर्तनात दिसून येतात. ऑटिस्टिक व्यक्तींना इतरांशी संवाद साधण्याच्या आणि सामाजिक आदान प्रदान करण्यात अडचणी येऊ शकतात.

लक्षणे:

१. विकासातील अडचणी : संवाद, सामाजिक संबंध आणि विचारांची लवचिकता ह्या तीन महत्वाच्या कौशल्यांमध्ये अडचणी येतात त्यांच्या वागण्यात बोलण्यात बदल जाणवतो आणि इतर मुलांपेक्षा ते वेगळे वाटतात .. उदाहरण म्हणजे,  स्वतःभोवती गिरक्या घेणे, कोणतीही गोष्ट दिसली की त्याला गोल गोल फिरवणे, एखाद्या विषयात रस असेल तर त्यातच रमून जाणे , बदल सहन न होणे यांप्रकारे 

२.संवेदनात्मक अडचणी (Sensory Difficulties) : मुलांना काही विशिष्ट  गोष्टींमध्ये संवेदनात्मक अडचणी येतात. जसे की , काही विशिष्ठ आवाज सहन न होणे, खूप हालचाल करणे – अस्थिरता, तहान/भूक/तापमान अश्या संवेदना समजायला  वेळ लागणे. 

निरीक्षणे

  • ऑटिझम बद्दल बोलताना नेहमी नेगेटिव का बोललं जातं ? सतत, त्यात पॉजिटिव काही नाहीच का असा प्रश्न पडतो. त्यामुळे याबद्दल बोलताना नेहमी ऑटिस्टिक  मूल वेगळे आहे हे समजून  घेतल्यास  त्यांच्याविषयी बोलताना नकारात्मक भावना कमी होण्यास मदत होईल.
  •  ‘नॉर्मल’ ची व्याख्या व्यक्तीगणिक  बदलत असते. प्रत्येकाचे नॉर्मल वेगळे आहे. याबद्दल बोलताना जॉन एल्रडररोबीनसन्स जे स्वतः ऑटिस्टिक  आहेत ते सांगतात, कोणाशी संवाद साधताना त्यांच्या डोळ्यात न बघणे, मला एकदम नॅचरल वाटते .
  • ॲलिस रोव  The Curly Hair Project या नावाने ब्लॉग लिहिते त्यात ती ऑटिझम म्हणजे काय याबद्दल सांगताना लिहिते,ऑटिस्टिक व्यक्ति हे जग वेगळ्या दृष्टीने बघतात, त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी असते.

महत्वाचे विश्लेषण

o ऑटिझम एक स्पेक्ट्रम disorder आहे, याला Autism Spectrum Disorder ASD असे म्हणतात. Spectrum म्हणजे इंद्रधनुष्य सारखे दिसणारे. याचा अर्थ प्रत्येक व्यक्ति वेगळी असते, कोणतेही एकच निकष सर्वांना लागू होऊ शकत नाही. No two autistic people are same.

o डॉक्टर स्टीफन शोर म्हणतात , ‘If you have met one person with Autism you have met one person only’ .

या पॉडकास्ट च्या शेवटी समृद्धी तिच्या कोंकणी भाषेत एक सुंदर विचार मांडते , कष्ट सोसूनही निरागस प्रेम करणारा जीव म्हणजे ऑटीझम. याचा स्वानुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन हे पॉडकास्ट नक्की ऐका. .

पुढे:

ऑटिझम: एका आईचा सुंदर प्रवास…

या भागात, सुचित्रा ठिपसे ह्या एक आई त्यांच्या ऑटिझम असलेल्या मुलासोबतच्या प्रवासाविषयी सांगते. हा प्रवास केवळ भावनिकच नाही, तर सामाजिक आणि वैयक्तिक आव्हानांनी भरलेला असतो. ती या प्रवासात आलेल्या अडचणी, समाजाचा दृष्टिकोन, आणि स्वतःमधल्या बदलांविषयी सांगते. तिच्या अनुभवातून सकारात्मकता, धैर्य, आणि प्रेम यांचं सशक्त दर्शन घडतं.

हा भाग ऐकताना श्रोत्यांना ऑटिझम बद्दल अधिक जाणून घेता येते. ह्या भागात सुचित्रा ठिपसे आपल्याशी संवाद साधताना आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या ऑटिझमच्या प्रवासाबद्दल. त्यांच्या मुलाला ऑटिझम असल्यामुळे कोणती आव्हानं त्यांच्या समोर आली? त्या आव्हानांना त्या कश्या सामोऱ्या गेल्या? ह्या सगळ्या अनुभवातून जाताना त्या काय काय शिकत गेल्या?प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना पॉसिटीव्हीटी किंवा सकारात्मकता कशी टिकवली? त्यांना कुणी साहाय्य केलं? त्या कश्या स्वतःला सशक्त बनवत गेल्या

हे ऐकुया त्यांच्याच शब्दात…

ऑटिझमविषयी सकारात्मकता जागरूकता वाढवणे आणि समाजात समजूतदारपणा निर्माण करणे आहे. श्रोत्यांना ऑटिझमविषयी अधिक माहिती मिळवून, त्याविषयी सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारण्याची प्रेरणा मिळते.

ऑटिझम- विविधता साजरी करूया

ह्या भागात, ऑटिझम मधली विविधता समजून घेऊया. Greta Thunberg च्या कामाला दाद देताना तिच्य ऑटिझमला साजरं करुया. तसंच सगळ्या ऑटिस्टिक  व्यक्ती आपल्या अडचणींना सामोरे जाता-जाता  यशाच्या छोट्या – छोट्या पायऱ्या चढत आहेत, त्यांच्याही  प्रयत्नांना बळ देऊया.

वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांचा कल जसे कला, शिक्षण , तंत्रज्ञान, तसेच, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद साजरा करणे यावर प्रकाश टाकला आहे . ऑटिझम असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यातील आव्हाने, त्यांना आवश्यक असलेली मदत, आणि त्यांना समाजात समाविष्ट करण्याचे महत्त्व यावर चर्चा केली आहे. तसेच, ऑटिझमविषयी समाजात असलेल्या गैरसमजांवर आणि त्यावरील उपाययोजनांवरही विचार मांडले जातात. या पॉडकास्ट बद्दल विस्तृत ऐकण्यासाठी, खालील लिंकवर क्लिक करा:

आत्तापर्यंत आपण स्वमग्न मुलांना वाढवताना/शिकवताना त्यांच्या पालकांना,शिक्षकांना वर्तनाच्या समस्यांना सामोरं जावं लागतं . त्यांचा नेमका अर्थ काय आणि येणाऱ्या अडचणी किंवा विविधता यांना सामोरे कसे जायचे याबद्दल ह्या भागात सुचित्रा ताई आपल्याला अजून माहिती देत आहेत.

ऑटिझम : वर्तनाच्या समस्या… या भागात, ऑटिझम असलेल्या मुलांच्या वर्तनाच्या समस्यांवर चर्चा केली आहे.

या पॉडकास्टचा उद्देश ऑटिझम असलेल्या मुलांच्या वर्तनाच्या समस्यांवर पालकांना जागरूक करणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देणे आहे.


या पॉडकास्टचा ऐकण्यासाठी, खालील लिंकवर क्लिक करा:

ऑटिझम : वर्तनाच्या समस्या; दुसऱ्या भागात- ABC chart, behaviour modification , उपयुक्त तंत्रांचा वापर याबद्दल योग्य मार्गदर्शन केले असून, सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारे बदल घडवता येतो, असा आशावादी संदेश दिला आहे. आणि आजची सर्वात महत्वाची टीप म्हणजे be consistent… आपल्या

विचारांमध्ये सातत्य ठेवुया.

या भागाच्या शेवटी आपल्याला एक महत्त्वाची जाणीव करून दिली जाते — की आपल्या मुलाच्या वर्तनामागे एक कारण असतं, एक भाषा असते, जी कदाचित शब्दांमध्ये व्यक्त होत नाही, पण ती समजून घेण्याचा प्रयत्न करणे, हेच पालकत्वाचं खरे सौंदर्य आहे. प्रत्येक मूल वेगळं असतं, त्याची वाट वेगळी असते, पण योग्य साथ आणि समज दिली, तर ती वाट एक सुंदर प्रवास ठरतो.

ऑटिझम ही अडचण नसून ती एक वेगळी वाट आहे थोडीशी कठीण, पण अत्यंत अर्थपूर्ण. प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला समजून घ्यायला हवं, त्याच्या गरजा ओळखायला हव्या आणि त्याला स्वीकारायला हवं. बदल शक्य आहे, प्रगती घडू शकते त्यासाठी फक्त गरज आहे धैर्याची, समजूतदारपणाची आणि निरंतर प्रेमाची.

जर तुम्हाला ऑटिझम, डाउन सिंड्रोम, ADHD किंवा इतर बौद्धिक अपंगत्वांबाबत काही शंका असतील,
किंवा एखाद्या मुलाच्या विकासात उशीर होतोय असं वाटत असेल,  तर नई दिशा टीम तुमच्या मदतीसाठी आहे.कुठल्याही प्रश्नांसाठी किंवा मार्गदर्शनासाठी,  कृपया आमच्या मोफत हेल्पलाइन क्रमांकावर – 844-844-8996  कॉल किंवा व्हॉट्सॲप करा.

आमचे समुपदेशक हिंदी, मराठी, इंग्रजी, मल्याळम, गुजराती, तेलुगू आणि बंगाली भाषांमध्ये उपलब्ध आहेत

Write Blog

Share your experiences with others like you!

English
Install App
If you're using: