Skip to main content

ऑटिझम म्हणजे विकासाच्या प्रक्रियेत असलेला एक वेगळेपणा

Default Avatar

Gauri

Like Icon 0Likes
Download Icon 0 Downloads

Key Takeaways:

भारतात वेगवेगळ्या भाषांमध्ये याला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. काही ठिकाणी याला “स्वयं मग्नता” असे म्हणतात, ज्याचा अर्थ होतो – “स्वतःच्या जगात रमलेला.” काही वेळा याचा अर्थ “स्वार्थीपणा” असा घेतला जातो. पण हे समजून घेणं गरजेचं आहे की, हे वेगळं वागणं एखादी चूक किंवा दोष नसून जगाकडे पाहण्याचा एक वेगळा मार्ग आहे.

आज आपण ऑटिझम या न्यूरोडेव्हलपमेंटल (मेंदूच्या विकासाशी संबंधित) वेगळेपणाबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. जेव्हा मुलाच्या विकासात किंवा वागणुकीत वेगळेपण लवकर ओळखलं जातं, तेव्हा त्या मुलाला आणि त्यांच्या कुटुंबाला योग्य मार्गदर्शन, साधनं आणि सेवा मिळू शकतात, ज्या त्यांच्या गरजेनुसार असतात.

ऑटिझम म्हणजे काय? ऑटिझम ही एक न्यूरोडेव्हलपमेंटल स्थिती आहे जी लहान वयातच दिसून येते.
ही स्थिती मुलाच्या संवाद कौशल्यावर आणि समाजातील लोकांशी संबंध ठेवण्यावर परिणाम करू शकते. अशा मुलांना अनेक वेळा आपल्याच विश्वात गुंतलेलं आपण बघतो, आणि हे त्यांच्या वागण्यात, खेळण्यात किंवा इतरांशी संबंध ठेवण्यात दिसून येतं.

ऑटिझमची लक्षणं कोणती? ही लक्षणं बहुतेक वेळा १८ महिन्यांनंतर दिसू लागतात. त्यामध्ये हे दिसू शकते:

  • मुलं संवाद साधण्यात किंवा भाषा वापरण्यात वेगळी असतात
  • त्यांना विशिष्ट गोष्टींची खूपच आवड असते
  • एकसारखीच हालचाल सतत करतात, जसं की हात हलवणे किंवा वस्तू रांग लावून ठेवणे

लवकर लक्ष देणं (Early Intervention) का महत्त्वाचं आहे? लवकर मदत मिळाली तर अशा मुलांच्या वाढीवर आणि जीवनमानावर चांगला परिणाम होतो. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

  • विशेष शिक्षण
  • भाषेच्या आणि बोलण्याच्या समस्यांसाठी थेरपी
  • सेन्सरी (इंद्रिय) विकासासाठी थेरपी

आपण काय करू शकतो? अशा मुलांना समजून घेणं, त्यांच्या गरजांनुसार मदत करणं आणि त्यांचं जीवन सोपं करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे.

मुख्य मुद्दे:

  • ऑटिझम असलेली मुलं अनेकदा त्यांच्या आवडीनिवडी आणि स्वतःच्या जगात गुंतलेली असतात.
  • ऑटिझम ही मेंदूच्या विकासाशी संबंधित स्थिती आहे, जी लहान वयात दिसते.
  • पालकांना बहुतेक वेळा मुलांमधील वेगळेपणा १८ महिन्यांनंतर जाणवतो.
  • संवाद साधण्याची पद्धत, वागणं आणि सामाजिक नातेसंबंध यात वेगळेपणा असतो, पण प्रत्येक मुलाचं अनुभव आणि क्षमता वेगळी असते.
  • लवकर मदत मिळणं (Early Intervention) खूप फायदेशीर ठरतं.
  • विशेष शिक्षण, भाषा थेरपी आणि सेन्सरी थेरपी यामुळे मुलांच्या विकासाला मदत होते.

ऑटिझम असलेल्या मुलांना पालक आणि काळजीवाहक कसे मदत करू शकतात

  1. विकसनात्मक वेगळेपणाचा परिणाम:
    ऑटिझम ही एक न्यूरोडेव्हलपमेंटल (मेंदूच्या विकासाशी संबंधित) स्थिती आहे जी बालपणातच सुरू होते. ही स्थिती मुलाच्या शिकण्याच्या, वाढीच्या आणि आजूबाजूच्या जगाशी संबंध ठेवण्याच्या पद्धतीवर परिणाम करते.
    ही वेगळी जडणघड त्यांच्या संवाद साधण्याच्या आणि सामाजिक वागणुकीच्या पद्धतींवर परिणाम करू शकते, पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्यात आनंद, प्रगती किंवा शिकण्याची क्षमता नाही.
  2. लवकर लक्षणं आणि निदान समजून घेणं:
    जर मुलाच्या वागण्यात बदल लवकर ओळखले गेले, तर योग्य उपचार अधिक प्रभावी होऊ शकतात.
    अलीकडच्या काळात ऑटिझमच्या निदानासाठी वापरली जाणारी निकष अधिक स्पष्ट झाले आहेत.
  3. संवादातील वेगळेपणा समजून घेणं:
    ऑटिझम असलेली मुलं अनेक वेळा वेगळ्या प्रकारे संवाद साधतात.
    काही मुलांना बोलायला थोडा अधिक वेळ लागू शकतो, तर काहीजण अप्रत्यक्ष (non-verbal) पद्धतीने संवाद साधणं पसंत करतात – जसं की हातवारे, चेहऱ्यावरील हावभाव किंवा इतर शारीरिक कृती.
  4. सामाजिक वागणुकीतील विविधता:
    प्रत्येक ऑटिझम असलेलं मूल वेगळं असतं. काही मुलांना शांतपणे संबंध जोडायला आवडतं, तर काहींना सेन्सरी (इंद्रिय) अनुभव किंवा अचानक झालेल्या बदलांना तीव्र प्रतिक्रिया असते.
  5. लवकर मदतीचं महत्त्व:
    लवकर दिलेली मदत – ज्याला “Early Intervention” म्हटलं जातं – ही मुलाच्या शिकण्याच्या आणि वाढीच्या संधी वाढवू शकते.
    मुलाच्या गरजेनुसार दिलेली मदत, जसं की खेळावर आधारित थेरपी, बोलणं आणि भाषा यासाठी मदत, आणि सेन्सरी थेरपी – खूप उपयुक्त ठरते.
  6. पालकांची भूमिका:
    पालक आणि काळजीवाहक हे मुलाच्या वागणुकीला समजून घेऊन, त्याच्या वेगळेपणाचा स्वीकार करून, योग्य काळजी देऊ शकतात.
    मुलाची गरज काय आहे, हे ओळखणं हेच योग्य मार्गदर्शनासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे.
  7. उज्ज्वल भविष्यासाठी आशा:
    जर ऑटिझम लवकर ओळखून योग्य थेरपी आणि मदत मिळाली, तर मुलाचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं.
    त्यांची स्वावलंबनाची क्षमता आणि आनंद वाढू शकतो. काही वेळा वैद्यकीय मदतीचीही गरज लागू शकते.

एक विशेष अनुभव:  जेव्हा आम्ही गोव्यातील विशेष शिक्षिका आणि ऑटिझम असलेल्या मुलाच्या आई – सौ. वर्षा देसाई – यांच्याशी बोललो, तेव्हा त्यांनी एक फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला:
“जसं प्रत्येक माणूस वेगळा असतो, तशी ही मुलंही आपल्या पद्धतीने खास असतात. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, कारण त्यांना या जगात सामावून घेणं थोडं कठीण जातं. पण आपण त्यांचं वेगळेपण समजून घेतलं, तर त्यांना मदत करता येते. त्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यात आनंद येतो.”

शुभेच्छा आणि आभार: या माहितीपटाच्या निर्मितीत सहभागी झालेल्या सर्व कुटुंबांचे आम्ही मन:पूर्वक आभार मानतो, ज्यांनी ऑटिझमविषयी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला.
आम्ही विशेषतः सौ. वर्षा देसाई यांचे आभार मानतो, ज्या गोव्यातील ऑटिझम असलेल्या मुलांच्या कुटुंबांसाठी सातत्याने आणि मनापासून कार्य करत आहेत.

जर तुम्हाला ऑटिझम, डाउन सिंड्रोम, ADHD किंवा इतर बौद्धिक अपंगत्वांबाबत काही शंका असतील,
किंवा एखाद्या मुलाच्या विकासात उशीर होतोय असं वाटत असेल,  तर नई दिशा टीम तुमच्या मदतीसाठी आहे.कुठल्याही प्रश्नांसाठी किंवा मार्गदर्शनासाठी,  कृपया आमच्या मोफत हेल्पलाइन क्रमांकावर – 844-844-8996  कॉल किंवा व्हॉट्सॲप करा.

आमचे समुपदेशक हिंदी, मराठी, इंग्रजी, मल्याळम, गुजराती, तेलुगू आणि बंगाली भाषांमध्ये उपलब्ध आहेत

Tags:
Write Blog

Share your experiences with others like you!

English