Skip to main content

ओरोमोटर स्किल्स आणि त्यांची बोलणे व खाण्यातील भूमिका

Ms Chitra Thadathil

Ms.Chitra Thadathil

Also available in: हिंदी English
Like Icon 0Likes
Download Icon 0 Downloads

Key Takeaways:

  1. ओरोमोटर स्किल्स (तोंडाचे व्यायाम) डाउन सिंड्रोम असलेल्या मुलांना बोलताना आणि खाण्यापिण्यात मदत करतात, कारण ते जीभ, ओठ आणि जबड्याला मजबूत करतात.
  2. चावणे, गिळणे आणि वेगवेगळ्या चव व टेक्श्चरचा अनुभव घेणे हे नैसर्गिकरित्या बोलण्याच्या स्नायूंना मजबूत करते.
  3. मुलाचे आरोग्य आणि भावनिक स्थिती त्याला थेरपीमध्ये भाग घ्यायला किती सक्षम आहे, यावर प्रभाव टाकू शकते.
  4. कधी मुलांना सेन्सरी फरक जाणवत असतात – त्यामुळे काही वेळा खाणे किंवा बोलण्याचे व्यायाम सोपे वाटतात, तर काही वेळा कठीण.
  5. फुगे फोडणे, स्ट्रॉने प्यायला शिकवणे अशा मजेदार खेळांमुळे तोंडाचे स्नायू मजबूत होतात.
  6. मुलाच्या नैसर्गिक हालचालींना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या सेन्सरी गरजांचा आदर करणे हे शिकणे सोपे आणि आनंददायक करते.

नयी दिशा ने स्पीच थेरपी कार्यशाळा आयोजित केली होती, ज्यात स्पीच आणि लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट श्रीमती चित्रा थडथील यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी पुढील गोष्टी सांगितल्या:

ओरोमोटर स्किल्स म्हणजे जीभ, ओठ, जबडा आणि तोंडातील इतर स्नायूंची हालचाल व समन्वय. हे स्नायू लहान असल्यामुळे आपण हात-पायांसारखे त्यांना थेट हालवू शकत नाही. त्यामुळे चावणे, गिळणे आणि तोंडाच्या मजेदार क्रियांनी हे स्नायू नैसर्गिकरित्या विकसित होतात. हे स्नायू बळकट झाल्यास बोलणे स्पष्ट होते आणि मुलांना खाणे अधिक आरामदायक वाटते.

खाण्याची क्रिया बोलण्याच्या विकासाला कशी मदत करते?

  • जेव्हा एखादं मूल चावतं, तोंडात अन्न हलवतं, गिळतं किंवा वेगवेगळे टेक्श्चर अनुभवतं, तेव्हा ते बोलण्यासाठी लागणाऱ्या स्नायूंना नैसर्गिकरित्या व्यायाम घडवत असतं.
  • ओठ बंद करणे, जीभ हलवणे आणि जबड्याला स्थिर ठेवणे अशा क्रियांनी स्पष्ट बोलण्यास मदत होते.
  • ओरोमोटर मसाज उपयुक्त ठरू शकतात, पण खरी प्रगती ही दैनंदिन क्रियेत या स्नायूंचा सक्रिय वापर केल्यावरच होते.

ओरोमोटर स्किल्सवर परिणाम करणारे महत्वाचे घटक

  • एकूण आरोग्य आणि भावनिक संतुलन:

    मुलाचे शारीरिक आणि भावनिक स्वास्थ्य थेरपीमध्ये सहभाग घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करते.

    मुलं आजारी असतील, खूप गोंधळलेली असतील किंवा अस्वस्थ वाटत असेल तर त्यांना बोलण्याचे आणि खाण्याचे व्यायाम कठीण आणि कमी प्रभावी वाटू शकतात.
  • सेन्सरी प्रोसेसिंग (इंद्रियांच्या अनुभवाची प्रक्रिया) आणि ओरोमोटर स्किल्स: काही मुलांना तोंडाच्या सेन्सेशन्स वेगळ्या पद्धतीने जाणवतात, त्यामुळे खाणे आणि बोलणे यावर त्याचा परिणाम होतो.
  • हायपोसेन्सिटिव्हिटी (कमी संवेदना):

    तोंडात अन्न आहे हे पूर्णपणे जाणवत नाही, त्यामुळे चावणे आणि जीभ हलवणे कठीण होते.

    अशा मुलांना अधिक चवदार किंवा वेगळ्या टेक्श्चरचे अन्न आवडते, जेणेकरून त्यांना जास्त सेन्सरी इनपुट मिळेल.
  • हायपरसेन्सिटिव्हिटी (जास्त संवेदना):

    काही टेक्श्चर, तापमान किंवा तोंडाच्या संवेदना खूप त्रासदायक किंवा अस्वस्थ वाटू शकतात.

    त्यामुळे मुलांना काही पदार्थांचा तिरस्कार वाटतो किंवा स्पीच व्यायाम सहन करणे कठीण होते.
  • मिक्स्ड सेन्सरी फरक:

    काही मुलांना काही भागांत कमी संवेदना असते आणि काही भागांत खूप जास्त संवेदना असते, त्यामुळे अन्न आणि स्पीच संदर्भात त्यांची प्रतिक्रिया कधी काय असेल हे सांगता येत नाही.

  • खेळ आणि शोधाच्या माध्यमातून ओरोमोटर ताकद वाढवण
  • बोलण्याचे स्नायू केवळ सरावाने नाही तर हालचाल आणि अनुभवातून विकसित होतात.
  • फुगे फोडणे, स्ट्रॉने पिणे, कोरडे फळे किंवा चिवट स्नॅक्स सारख्या प्रतिकार देणाऱ्या वस्तू चावणे आणि  तोंडाच्या हालचाली करणे अशा क्रियांनी हे स्नायू नैसर्गिकरित्या मजबूत होतात.
  • मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नाच्या टेक्श्चरचा अनुभव घेण्यासाठी, चेहऱ्याच्या ओव्हरएक्स्प्रेसिव्ह हालचाली करण्यासाठी आणि  तोंडाच्या व्यायामात भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केल्याने खूप फरक पडतो.

मुलांसाठी सपोर्टिव्ह दृष्टिकोन तयार करणे

  • संवेदनशीलतेचा आदर करा – जर मुलाला काही विशिष्ट अन्नपदार्थ किंवा व्यायाम नकोसे वाटत असतील, तर त्याच्या सोयीप्रमाणे पद्धत बदलावी.
  • नैसर्गिक हालचालीस प्रोत्साहन द्या – चावणे, फुगे फोडणे, स्ट्रॉने पिणे आणि मजेदार बोलण्याचे खेळ यामधून.
  • मजेदार आणि आकर्षक ठेवा – मुलांवर दबाव आणू नका आणि ओरोमोटर क्रिया रोजच्या आनंददायक सवयींमध्ये मिसळा.

प्रत्येक मुलाचा ओरोमोटरचा प्रवास वेगळा असतो. योग्य पाठबळ आणि ताकदीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या दृष्टिकोनातून त्यांना नैसर्गिक आणि सोप्या पद्धतीने बोलण्याच्या व खाण्याच्या कौशल्यांचा विकास करता येतो.

अधिक माहितीसाठी तुम्ही हे केअरगिव्हर मॅन्युअल डाउनलोड करू शकता, ज्यामध्ये डाउन सिंड्रोम असलेल्या व्यक्तींच्या दीर्घकालीन देखभालीसंदर्भात माहिती दिली आहे.

जर तुम्हाला ऑटीझम, डाउन सिंड्रोम, ADHD किंवा अन्य बौद्धिक व विकासात्मक अडचणींबाबत काही प्रश्न असतील, किंवा विकास प्रक्रियेतील काही फरकांबाबत चिंता असेल, तर नयी दिशा टीम तुमच्या सोबत आहे.

कुठलाही प्रश्न असल्यास आमच्या फ्री हेल्पलाइनवर संपर्क करा: 844-844-8996. तुम्ही कॉल किंवा WhatsApp करू शकता.

आमचे काउंसलर्स इंग्रजी, हिंदी, मल्याळम, गुजराती, मराठी, तेलुगू आणि बंगाली या भाषांमध्ये उपलब्ध आहेत.

DISCLAIMER: ही मार्गदर्शिका केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. कृपया नेहमी पात्र आरोग्य व्यावसायिकांचा सल्ला घ्या.

Tags:
Write Blog

Share your experiences with others like you!

No Related Resources Found.

No Related Services Found.
English