Skip to main content
Install App
If you're using:

Augmentative and Alternative Communication (AAC) म्हणजे काय आणि याचे फायदे काय आहेत?

avaz-logo-hi-res-500
Avaz
Also available in: हिंदी English
Like Icon 0Likes
Download Icon 0 Downloads

Key Takeaways:

  1. AAC म्हणजे पूरक पर्यायी संवाद पद्धती. ज्या व्यक्तींना बोलता येत नाही किंवा बोलण्यात अडचण आहे, त्यांना बोलण्याव्यतिरिक्त इतर मार्गांनी संवाद साधता यावा म्हणून वापरली जाते. हे उपकरण म्हणजे त्या मुलाचाआवाजअसतो, जे त्याच्या दैनंदिन आयुष्यातील सामान्य शब्द कल्पना वापरून संवाद साधायला मदत करतात.
  2. AAC चे फायदे:
    AAC
    वापरून मूल स्वतंत्रपणे संवाद साधू शकते भाषिक आणि सामाजिक नातेसंबंध तयार करू शकते.
  3. कोणासाठी उपयोगी?
    ज्यांना Autism (स्वमग्नता), Cerebral Palsy (मेंदू विकृती) किंवा इतर विकासातील अडचणीमुळे बोलता येत नाही, अशा मुलांसाठी AAC खूप उपयुक्त ठरते.
  4. AAC चे प्रकार:
    • Aided AAC – ज्यासाठी उपकरण किंवा साधनांची मदत लागते (उदा. मोबाईल अ‍ॅप, पिक्चर कार्ड्स).
    • Unaided AAC – ज्या पद्धतींसाठी कोणतेही उपकरण लागत नाही (उदा. हातवारे, इशारे).

ऑगमेंटेटिव आणि ऑल्टरनेटिव कम्युनिकेशन (AAC):

AAC म्हणजे काय?

AAC हे अशा प्रकारचे संवादाचे मार्ग आहेत, जे बोलण्यास अडचण असलेल्या मुलांना किंवा व्यक्तींना न बोलता स्वतःच्या भावना, गरजा आणि विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यास मदत करतात.
उदाहरणार्थ – चित्र, लिहिलेले शब्द, मोबाईल अ‍ॅप्स किंवा विशेष उपकरणे.

आपल्याला सगळ्यांना इतरांशी संवाद साधायचा असतो. बहुतेक वेळा आपण बोलून हे करतो. पण काही मुलांना बोलणे कठीण जाते. अशा मुलांसाठी AAC हे एक पर्यायी आणि मदतीचे साधन असते.

AAC वापरल्याने मूल त्याच्या गरजा, भावना, आणि विचार इतरांना सांगू शकते. हे उपकरण त्या मुलाचा “आवाज” बनते. म्हणून त्यात रोजच्या वापरातील गोष्टींचे शब्द आणि चित्र असणे गरजेचे आहे – जसे की: जेवण, खेळ, शाळा, कुटुंब वगैरे.

Avaz App बद्दल अधिक माहिती हवी असल्यास: www.avazapp.com या वेबसाईटला भेट द्या – हा AAC अ‍ॅप मुलांना संवाद साधायला मदत करतो.

तुम्ही एक प्रेझेंटेशन डाउनलोड करू शकता, ज्यात समजावून सांगितले आहे की AAC तुमच्या मुलाच्या जीवनात कसा उपयोगी पडतो आणि तो स्वतः संवाद करणारा स्वतंत्र व्यक्ती कसा बनतो.

तसंच, एक व्हिडिओही आहे, ज्यात दाखवले आहे की न बोलू शकणारे मूल AAC च्या मदतीने इतरांशी कसे मोकळेपणाने बोलू शकते.

जर तुमच्याकडे खालील प्रकारचे प्रश्न असतील: माझ्या मुलाला बोलता येत नाही, त्याला Autism, Down Syndrome किंवा ADHD आहे, त्याच्या विकासात उशीर होतोय, तर तुम्ही Nayi Disha या संस्थेच्या मोफत हेल्पलाईनवर (844-844-8996) कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅप करू शकता.

आमचे समुपदेशक हिंदी, इंग्रजी, मराठी, तेलुगू, मल्याळम, गुजराती आणि बंगाली भाषांमध्ये बोलतात.

महत्त्वाचीसूचना (Disclaimer):

ही माहिती केवळ समजावून सांगण्यासाठी आहे. कृपया योग्य उपचार व सल्ल्यासाठी अनुभवी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Write Blog

Share your experiences with others like you!

English