Skip to main content

ADHD म्हणजे काय आणि लक्षणं कशी ओळखावीत?

Default Avatar
Nayi Disha Team
Also available in: English
Like Icon 0Likes

Key Takeaways:

1. ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) ही एक सामान्य मेंदूच्या विकासाशी संबंधित स्थिती आहे. यात मुलांचं लक्ष केंद्रित करणं, भावनांचं नियंत्रण, शिकण्याची प्रक्रिया आणि समाजात वावरणं – या गोष्टींवर परिणाम होतो.
2. ADHD असलेल्या मुलांना लक्ष लागणं, काम पूर्ण करणं, शाळेतील अभ्यास किंवा मित्रांशी नातं जपणं – यात अडचणी येऊ शकतात.
3. ADHD ओळखणं महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे त्या मुलाला योग्य मदत आणि सुविधा मिळू शकतात
4. प्रत्येक मूल वेगळं असतं, त्यामुळे ADHD ची लक्षणं सुद्धा वेगवेगळी असतात. काही ठराविक लक्षणांवरूनच निदान होतं असं नाही
5. जर तुमच्या मुलामध्ये अनेक लक्षणं दिसत असतील आणि ती सतत असतील, तर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं योग्य ठरेल. यामुळे योग्य मार्गदर्शन मिळू शकतं
6. एडीएचडीचे तीन प्रकार आहेत:
– Inattentive presentation: लक्ष न लागणं, विसराळूपणा.
– Hyperactive-impulsive presentation: सतत हालचाल, विचार न करता कृती करणं.
-Combined presentation: वरील दोन्ही प्रकारांची लक्षणं एकत्र असणं.
7. ADHD समजून घेण्यासाठी माहितीपत्रकं, व्हिडीओज आणि तज्ज्ञांची मतं उपयोगी पडू शकतात.

ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) म्हणजे लक्ष न लागणे आणि अतिचंचलतेसह वागणं – ही मेंदूच्या विकासाशी संबंधित एक वेगळी अवस्था आहे. ही स्थिती मुलाच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर, भावना सावरण्यावर, शिकण्यावर आणि इतरांशी नातं ठेवण्यावर परिणाम करू शकते. त्यामुळे शाळेतील अनुभव आणि मित्रांशी संबंध या गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडू शकतात.

ADHD असलेली मुलं अभ्यास, काम पूर्ण करणं किंवा शिकण्याच्या पद्धतीत वेगळे वागू शकतात. प्रत्येकाचा शिकण्याचा  प्रवास वेगळा असू शकतो. त्यामुळे ADHD ओळखणं आणि समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून मुलाला योग्य आधार देता येईल.

ADHD चे प्रकार

ADHD चे प्रामुख्याने तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते, जे प्रामुख्याने मुलाच्या वागण्यात दिसणाऱ्या मुख्य लक्षणांवर आधारित ठरवले जातात:

  1. प्रामुख्याने लक्ष विचलन असलेला प्रकार (Inattentive Type)
  • ह्या मुलांना अनेकदा एकाच वेळी अनेक गोष्टी करायला आवडतात.
    उदाहरण: एखादं मूल वेगवेगळ्या चित्रकला प्रोजेक्टमध्ये रस घेईल, पण एक पूर्ण होण्याआधी दुसऱ्याकडे वळेल. यांची माहिती समजून घेण्याची पद्धत थोडी वेगळी सरळ रेषेने न होता कधी स्वप्नात रमणारी असू शकते.
  • कधी कधी ही मुलं माहिती सरळ क्रमाने न शिकता वेगळ्या पद्धतीने शिकतात. यामुळे वेळेचं नियोजन किंवा काम नीट पूर्ण करणं कठीण होऊ शकतं
    उदाहरण: वर्गात बसून स्वप्नात हरवलेले दिसतील आणि वेळेचं भान राहणार नाही.

2. प्रामुख्याने अतिचंचल-उत्स्फूर्त प्रकार (Hyperactive-Impulsive Type)

  • ही मुलं उर्जेने भरलेली असतात आणि सतत हालचाली करत असतात.
     उदाहरण: शिकवणी चालू असताना सतत खुर्चीवरून उठणं, वेळ न पाहता बोलायला लागणं.?
  • अशा मुलांना हालचाल करायला लागणाऱ्या खेळांची विशेष आवड असते.
     उदाहरण: त्यांना धावपळ असलेले, भरपूर ऊर्जा लागणारे खेळ अधिक आवडतात.

    3. मिश्र प्रकार (Combined Type)
  • यात दोन्ही प्रकारांची लक्षणं असतात – कधी लक्ष विचलित होणं, तर कधी अतिचंचल वागणं.
    उदाहरण: मूल एखादं सर्जनशील काम करताना उत्साह दाखवतं, पण मध्येच दुसऱ्या गोष्टीकडे वळतं. त्याच वेळी, सतत हालचाल करणंही दिसतं.
  • ही मुलं कधी खूप ऊर्जेने भरलेली असतात आणि कधी पूर्णपणे विषयाबाहेर जातात.
    उदाहरण: एका क्षणी खूप आनंदाने गप्पा मारणं आणि दुसऱ्या क्षणी लक्ष हरवलेलं दिसणं.

    प्रत्येक मूल वेगळं असतं, त्यामुळे ADHD चं प्रत्येकाचे वेगळे स्वरूप असू शकतं. तुम्ही जितकं मुलाला समजून घ्याल, तितकं त्याला योग्य आधार देणं शक्य होईल.

ADHD ची लक्षणे ओळखण्याचे मार्ग

ADHD ही एक न्यूरोडेव्हलपमेंटल आहे जी मुलांच्या वागणुकीवर, शिकण्यावर आणि सामाजिक संवादावर परिणाम करते. प्रत्येक मुलामध्ये ही लक्षणं थोडी वेगळी असू शकतात, त्याच्या वय आणि स्वभावानुसार बदलू शकतात.

अवधान कमी असणारी लक्षणं (Inattentive Traits):

  • लक्ष एकवटून ठेवण्यात अडचण – विशेषतः जेव्हा एखादं काम जास्त वेळ करावं लागतं.
  • गोष्टी हरवणं, किंवा दररोजचे काम विसरणं.
  • ओळखीच्या ठिकाणीसुद्धा विसरणं किंवा लक्ष न लागणं

अतिउत्साही वागणूक (Hyperactive Traits):

  • सतत हालचाल करत राहणं – जसं की खुर्चीत बसून थोड्यावेळाने हालचाल करणं, चुळबुळ करणं, चालणं, टकटक वाजवणं.
  • शांतपणे एकाच ठिकाणी बसून राहणं कठीण जाणं.
  • जास्त शारीरिक हालचाली असलेली खेळ किंवा क्रिया आवडणं.

उत्स्फूर्त आणि विचार न करता कृती करणं (Impulsive Traits):

  • विचार न करता बोलणं किंवा कृती करणं – जसं की संभाषणात मध्येच बोलून जाणं.
  • स्वतःचा नंबर येईपर्यंत वाट बघणं कठीण जाणं, नियम पाळणं अवघड जाणं.
    भावनांना त्वरीत प्रतिसाद देणं – त्यामुळे कधी राग, निराशा, ओरड-आरडा होतो.

काही अजून लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी:

  • भावनिक स्थिरता: ADHD असलेल्या मुलांना कधी कधी भावना हाताळणं कठीण जातं – विशेषतः राग किंवा अपेक्षा पूर्ण न झाल्यावर.
  • वेळेचं भान: काम किती वेळ लागेल हे समजणं कठीण जातं; एका क्रियेतून दुसरीकडे जाण्यात वेळ लागतो.
  • काम पूर्ण करण्याची क्षमता बदलते: त्यांचा रस, आजूबाजचं वातावरण आणि ऊर्जा यावर काम पूर्ण करण्याची क्षमता अवलंबून असते.
    सर्वसमावेशक मूल्यांकन का महत्त्वाचे आहे

ADHD चे केवळ त्रासदायक पैलू नाही, तर मुलाची ताकद, आवड आणि सहाय्याची गरज शोधण्यासाठी सखोल निरीक्षण महत्त्वाचं आहे. यामुळे मुलासाठी विशेष योजना तयार करता येतात – जी त्याच्या शैक्षणिक, भावनिक आणि सामाजिक विकासासाठी उपयुक्त ठरतात. लवकर ओळख कुटुंबे आणि शिक्षकांना मुलाच्या नैसर्गिक क्षमतांशी जुळणारे निवास, समर्थन प्रणाली आणि हस्तक्षेप अंमलात आणण्यास अनुमती देते, दीर्घकालीन यश आणि आत्मविश्वास वाढवते.

लवकर निदान का गरजेचं आहे?

ADHD ची लक्षणं लवकर ओळखल्यास वेळेत योग्य पर्यावरण, समजून घेणारे शिक्षक आणि सहकार्य मिळू शकतं. पालक, शिक्षक आणि देखभाल करणाऱ्यांना समजतं की मुलाचं शिकण्याचं पद्धत, भावना आणि संवेदनशीलता कशी वेगळी आहे. त्यामुळे “समस्या” न समजता “वेगळेपण” म्हणून स्वीकार करता येतं.

लवकर ओळखीचे फायद

1.वैयक्तिक सहाय्य: मुलाच्या नैसर्गिक शैलीनुसार विशेष सल्ला, थोडी विश्रांती घेणे – ब्रेक्स, ठरलेली दिनचर्या इ. योजना करता येतात..

2.भावनिक स्थैर्य: लवकर समजल्यावर कौटुंबिक सहकार्याने भावना नियंत्रित करणं शक्य होतं.

3.सामाजिक कौशल्य वाढवणं: लवकर समजून घेतल्यानेयोग्य मार्गदर्शनाने मुलांना मित्रांशी संवाद साधणं आणि नियम समजून घेणं सोपं जातं. मुलांना आत्मविश्वासाने समवयस्कांच्या संवादात नेव्हिगेट करण्यास मदत होते

4.समावेशक शिक्षण वातावरण: एडीएचडी लवकर ओळखल्याने विविध शिक्षण शैली स्वीकारणाऱ्या समावेशक पद्धती लागू करण्यास प्रोत्साहन मिळते, वाढीसाठी एक सहाय्यक जागा तयार होते.

5. स्वतःला समजून घेणं: लहानपणापासूनच मुलं स्वतःची ताकद ओळखून स्वतःसाठी बोलायला शिकतात.

टीप: ADHD आणि इतर शिकण्यात येणाऱ्या अडचणी प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसू शकतात. एकच लक्षण सगळ्यांमध्ये दिसतंच असं नाही. पण या पैकी अनेक लक्षणं तुमच्या मुलामध्ये दिसत असतील, तर कृपया तज्ञांशी सल्ला घ्या.

तथापि, जर सादरीकरणात वर्णन केलेली अनेक चिन्हे तुमच्या मुलाच्या अनुभवांशी जुळत असतील, तर व्यावसायिक मूल्यांकनामुळे स्पष्टता आणि मार्गदर्शन मिळू शकते.

तुम्हाला Autism, Down Syndrome, ADHD किंवा इतर developmental फरकांबद्दल प्रश्न असतील, किंवा मुलाच्या वाढीबद्दल शंका असेल, तर Nayi Disha टीम तुमच्यासोबत आहे. आमच्या मोफत हेल्पलाइनवर 844-844-8996 वर कॉल किंवा WhatsApp करा. आमचे सल्लागार इंग्रजी, हिंदी, मराठी, तेलुगु, मल्याळम, गुजराती आणि बंगाली भाषांमध्ये मार्गदर्शन करतात.

DISCLAIMER: ही माहिती फक्त मार्गदर्शनासाठी आहे. कृपया वैयक्तिक सल्ल्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या.

Tags:
Write Blog

Share your experiences with others like you!

No Related Resources Found.

No Related Services Found.
English