Skip to main content
Install App
If you're using:

ADHD विषयी जाणून घ्या, ADHD म्हणजे काय?

Default Avatar
Ummeed Child Development Center
Also available in: हिंदी English
Like Icon 0Likes
Download Icon 0 Downloads

Key Takeaways:

  1. ADHD ही वर्तनातील चूक किंवा व्यक्तीची कमजोरी नसून एक न्यूरोडेवलपमेंटल स्थिती आहे.
  2. ADHD असलेली मुले चुकीच्या नाही तर वेगळ्या प्रकारे कार्य करतात; त्यांना दोष न देता समजून घेणं गरजेचं आहे.
  3. ADHD लक्ष देण्याची क्षमता, आवेग नियंत्रण, आणि क्रियाशीलतेवर परिणाम करते, जे रोजच्या आयुष्यात अडचणी निर्माण करू शकते.
  4. ADHD ची लक्षणे म्हणजे लक्ष न लागणं, पटकन विचलित होणं, अस्वस्थता, किंवा आवेगशील वर्तन.
  5. ADHD असलेली मुले त्यांच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम प्रयत्न करत असतात, ही वागणूक जाणूनबुजून नसते.
  6. ADHD सहसा इतर शिकण्याच्या किंवा भावनिक वेगळेपणांसह असते ज्यासाठी संपूर्ण मदतीची गरज असते.
  7. मुलाच्या मूल्यांकनाने त्याला चांगल्या प्रकारे समजून घेता येते आणि त्याला लेबल न लावता योग्य मदतीची योजना करता येते. 
  8. चांगल्या ADHD तपासणीत पालक, शिक्षक आणि मुलाचा स्वतःचा आवाज घेतला जातो.
  9. काही मुलांना औषधोपचार उपयुक्त ठरू शकतो — पण तो संपूर्ण उपचार योजनेचा फक्त एक भाग आहे.
  10. 10.मदतीच्या टीममध्ये विशेष शिक्षक, मानसोपचारतज्ञ, समुपदेशक, आणि सामाजिक कार्यकर्ते असू शकतात.
  11. 11.नियमबद्ध जीवनशैली, दिनचर्या आणि प्रेमळ आधार मुलांना यशस्वी होण्यासाठी मदत करतात.
  12. 12.योग्य साधने आणि मार्गदर्शनाने ADHD असलेली मुले शाळा, नातेवाईक, आणि आयुष्यात यशस्वी होऊ शकतात.

 

मुंबईमधील उमेद चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरची ही व्हिडिओ सादरीकरण डॉ. विभा कृष्णमूर्ती यांनी केले आहे, ज्यात त्यांनी लक्षाभाव/हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD) म्हणजे काय, ते मुलांमध्ये कसे दिसू शकते, आणि अशा मुलांना मदत करण्यासाठी कुटुंब आणि तज्ञ काय करू शकतात हे समजावलं आहे.

आपण पालक असाल, शिक्षक असाल किंवा व्यावसायिक, हा लेख ADHD अधिक समजून घेण्यास आणि सहानुभूतीने पाहण्यास तसेच लवकर लक्षणं ओळखण्यापासून तपासणी आणि उपचार करण्यापर्यंतमदत करेल.

ADHD म्हणजे काय?

ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर. ही एक न्यूरोडेवलपमेंटल स्थिती आहे, म्हणजे माणसाच्या मेंदूचा विकास आणि कार्यप्रणालीशी संबंधित आहे. ADHD लक्ष देण्याच्या क्षमतेवर, आवेग नियंत्रणावर आणि क्रियाशीलतेवर परिणाम करते आणि बहुतेक वेळा ही लक्षणं लहानपणी दिसून येतात.

पण ADHD म्हणजे कुणी सुस्त, अनुत्साही किंवा वाईट वागत आहे असे नाही. ADHD असलेल्या मुलांचा मेंदू वेगळ्या प्रकारे कार्य करतो. त्यांचा मेंदू माहिती प्रक्रिया करतो आणि जगाला प्रतिसाद देतो अशा पद्धतीने ज्यामुळे पारंपरिक शाळा किंवा घराच्या वातावरणात काही अडचणी येऊ शकतात, पण त्यामुळे त्यांची क्षमता, बुद्धिमत्ता किंवा समजून घेण्याचा अधिकार कमी होत नाही.

ADHD मुलांमध्ये कसे दिसू शकते?

ADHD प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसू शकतो आणि वयाच्या अनुसार लक्षणं बदलू शकतात. बहुतेक वेळा ही लक्षणं 12 वर्षांपूर्वी दिसू लागतात, पण काही जण तर किशोरवयीन किंवा प्रौढावस्थेतही त्यांच निदान होऊ शकते, विशेषतः जेव्हा त्यांच्या स्वतःच्या मुलांना ADHD ची तक्रार होते कारण ADHD कुटुंबांमध्ये वारसा स्वरूपात येऊ शकतो.

ADHD समजण्यासाठी, मुलाच्या दैनंदिन कार्यक्षमतेवर, शाळेत, घरी किंवा सामाजिक संबंधांमध्ये यावर मोठा परिणाम होणे आवश्यक आहे.

काही मुलांमध्ये ADHD चे असे लक्षण दिसू शकतात:

१. लक्ष न लागणं (Inattention):

  • असे दिसू शकते की ते ऐकत नाहीत, आदेश विसरतात, वस्तू वारंवार हरवतात, किंवा काम पूर्ण करत नाहीत.
  • शाळेच्या कामाचे आयोजन करणे किंवा दीर्घकाळ लक्ष केंद्रित करणे कठीण जाते.
  • काही वेळा एखाद्या गोष्टीत खूप गुंतून राहतात (hyper-focused), ज्यामुळे लक्ष दुसऱ्या गोष्टीकडे वळवणे अवघड जाते.

२. जास्त हालचाल आणि आवेगशीलता (Hyperactivity and Impulsivity):

  • मुलं सतत हलत असतात, कंटाळवाणे वाटू शकते, किंवा नेहमीच हालचालीत असतात.
  • खूप बोलतात, बोलताना इतरांना तोडतात, किंवा खेळात आपला चान्स घेण्यासाठी थांबणं अवघड वाटतं.

यामुळे सामाजिक संबंधांमध्ये अडचण येऊ शकते.

  • ही वागणूक जाणूनबुजून नसते. ADHD असलेली मुले “दुष्ट” किंवा आज्ञापालन न करणारी नाहीत; त्यांना स्वतःवर संयम ठेवण्यात खऱ्या अडचणी येतात आणि त्यांना दोष देण्याऐवजी मदतीची गरज आहे.

मुलांसाठी ADHD का आव्हानात्मक ठरू शकते?

ADHD फक्त शाळेपुरते मर्यादित नाही, तर आयुष्याच्या अनेक भागांवर परिणाम करतो. मुलांना कधीकधी:

  • गृहपाठ आणि वेळेचे नियोजन करणे कठीण वाटते.
  • अनेक टप्प्यांच्या सूचना पाळण्यात अडचण येते.
  • आपला चान्स येईपर्यंत थांबणे अवघड जाते.
  • इतरांकडून समजून न घेता “आळशी” किंवा “उपद्रवी” असे म्हणाले जाणे.
  • मैत्री करण्यामध्ये किंवा टिकवून ठेवण्यात अडचणी येणे.
  • ADHD असलेल्या काही मुलांना इतर शिकण्याच्या अडचणी (उदा. डिस्लेक्सिया) देखील असू शकतात. अशा वेगळ्या गरजांसाठी अधिक वैयक्तिक मदत आवश्यक असते.

तुमच्या मुलाला ADHD असल्याचा संशय असल्यास काय कराल?

ADHD असल्याचा संशय असल्यास तज्ञांची तपासणी करणे गरजेचे आहे — मुलाला लेबल लावण्यासाठी नाही, तर त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेऊन योग्य मदत देण्यासाठी. तपासणीमध्ये या लोकांचा सहभाग असावा:

  • पालक
  • शिक्षक किंवा काळजी घेणारे
  • मुलगा/मुलगी स्वतः
  • मुलाला या प्रक्रियेत सहभागी करणे महत्त्वाचे आहे कारण त्यांचे अनुभव आणि भावना महत्त्वाच्या आहेत.

ADHD चे निदान कसे होते?

ADHD चे निदान सहसा खालील तज्ञांची टीम देते:

  • विकासशील बालरोगतज्ञ
  • बाल मानसशास्त्रज्ञ
  • क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ

जर ADHD च निदान झाल तर, डॉक्टर औषधे सुचवू शकतात, जी लक्ष न लागणे, आवेगशीलता आणि जास्त हालचाली कमी करण्यात मदत करतात. पण औषधोपचार हा एकूण मदतीचा फक्त एक भाग आहे. तज्ञ तुमच्यासोबत काम करून मुलाचा विकास शैक्षणिक, भावनिक आणि सामाजिक पातळीवर करत असतात.

निदानानंतर काय होते?

  • तपासणी झाल्यानंतर तज्ञ मुलाच्या पुढील मदतीसाठी जोडले जाऊ शकतात:
  • समुपदेशक — भावनिक नियंत्रण आणि सामना कौशल्यांसाठी
  • विशेष शिक्षक — शैक्षणिक धोरणे आणि सोयीसुविधा देण्यासाठी
  • क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ — वर्तनातील खोल समज किंवा उपचारासाठी
  • सामाजिक कार्यकर्ता — कुटुंबाला सेवा आणि समन्वयात मदत करण्यासाठी

सुरुवातीला जरा कठीण वाटू शकते

सर्वकाही एकत्र समजून घेणे आणि सांभाळणे जरा आव्हानात्मक वाटू शकते. पण वेळाने, समजूतदारपणा आणि सहकार्याने, ADHD असलेल्या बऱ्याच मुलांना त्यांच्या अडचणींवर मात करायला आणि त्यांच्या ताकदीचा उपयोग करायला शिकता येतो.

ADHD सोबत ताकद आणि यशाची शक्यता

ADHD म्हणजे यशापासून अडथळा नाही हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. अनेक ADHD असलेल्या लोकांमध्ये सर्जनशीलता, ऊर्जा आणि मोठ्या प्रमाणावर विचार करण्याची क्षमता असते. जेव्हा त्यांना योग्य वातावरण मिळते, तेव्हा ते कल्पनाशील, नवोन्मेषी आणि वेगाने निर्णय घेण्यात उत्कृष्ट असू शकतात.

त्यांना पूर्ण क्षमतेने वाढण्यासाठी गरज असते:

  • रचना: (जसे की नियत दिनचर्या आणि स्पष्ट अपेक्षा)
  • समर्थन: (शिक्षक, पालक आणि तज्ञांकडून)
  • समजूतदारपणा: (विशेषतः जेव्हा गोष्टी अपेक्षेप्रमाणे जात नाहीत)

योग्य मदतीने, ADHD असलेली मुले मजबूत नाते तयार करू शकतात, शाळेत यशस्वी होऊ शकतात, आणि आत्मविश्वासपूर्ण, सक्षम प्रौढ बनू शकतात.

तुमच्या मुलाला ADHD आहे किंवा संशय आहे का?

सुरुवातीला थोडं ओव्हरव्हेल्म होणं सामान्य आहे. पण लक्षात ठेवा — तुम्ही एकटे नाही आहात आणि मदत उपलब्ध आहे. वेळेवर तपासणी, सहकार्यपूर्ण काळजी आणि सातत्यपूर्ण पाठिंबा यामुळे तुमचं मूल यशस्वी होऊ शकतं.

मदतीची गरज आहे का? प्रश्न आहेत का?

जर तुम्हाला ADHD, Autism, Down Syndrome किंवा इतर विकासविषयक फरकांबद्दल चिंता असेल तर नवी दिशा टीम तुमच्यासाठी आहे. आमच्या मोफत हेल्पलाइनवर कॉल किंवा व्हॉट्सअॅप करा: 844-844-8996
आमची टीम इंग्रजी, हिंदी, मल्याळम, गुजराती, मराठी, तेलुगू आणि बंगाली भाषेत बोलते.

DISCLAIMER:
हा लेख केवळ माहितीपुरता आहे. भाषांतरात किंवा उपचाराबाबत योग्य मार्गदर्शनासाठी कृपया योग्य आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्या.

Tags:
Write Blog

Share your experiences with others like you!

English