Skip to main content

ऑटिझम म्हणजे काय ? 

Default Avatar

Dr Avinash C Bhosale

Like Icon 0Likes
Download Icon 0 Downloads

Key Takeaways:

Infographic Image

ऑटिझम म्हणजे काय ? 

ऑटिझम (स्वमग्नता) हि जन्मभर राहणारा वैकासिक स्थिति आहे. विकासाच्या दोन मुख्यक्षेत्रातील वागणुकीवरून ऑटिझम लक्षात येतो.

  • एक म्हणजे समजून घेणे आणि संवाद साधणे ह्याच्या क्षमतेतील अडचणी. 
  • दुसरं संकुचित आवडीनिवडी, वर्तनातली पुनरावृत्ती व स्वमग्नता. 

ऑटिझमच एकच असं लक्षण सांगता येणार नाही तसेच ऑटिझम असलेल्या मुलांमध्ये लक्षणे एक सारखीच असतील असे नाही . वर्तवणुकीतील हि लक्षणे अगदी लहानपणापासूनच ह्या मुलांत सातत्याने असतात ( पण बऱ्याचदा त्या कडे उशीरा लक्ष जाते). आणि त्यामुळे त्यांना रोजच्या जगण्यात अडथळे जाणवतात. 

ऑटिझम का होतो? 

ऑटिझम हा न्युरो डेव्हलेपमेंटल डिसऑर्डर आहे. त्याची निश्चित कारणे अजूनतरी आपल्याला ठाऊक नाहीत. गर्भावस्थेपासून ह्या मुलांच्या मेंदूच्या पेशींची जोडणी वेगळ्या प्रकारची असल्याने मेंदूची वेगळी कार्यप्रणाली दिसून येते. 

सर्वसाधारण मुलं जेव्हा इतर लोक जे बोलतात, वागतात त्याला समजून घेऊन त्याला प्रतिसादात्मक कृती करतात त्यासाठी आवाज शब्द आणि हालचालीचा वापर करतात. पण ऑटीझम असलेल्या मुलांमध्ये या जाणिवा तितक्याशा विकसित झालेल्या नसतात म्हणूनच त्यांच्या वागण्यामध्ये वेगळेपणा जाणवतो. एकूणच संवाद सुरु कसा करावा आणि तो पुढे कसा न्यावा हे ऑटीझम असलेल्या मुलांना कळत नाही. या समस्यांमुळे ऑटिझम असलेली मुलं इतर मुलांमध्ये मिळून-मिसळून खेळण्यासाठी उत्सुक नसतात. 

प्रमाण

  • अमेरिकेत दर ३१ मुलांमागे १ तर भारतात दर १०० मुलांमागे किमान १ मुल ऑटीझमग्रस्त आहे. 
  • ऑटीझमचे प्रमाण मुलांमध्ये मुलींपेक्षा चार पटीने अधिक आहे. 
  • सर्व प्रदेशातील तसेच सर्व आर्थिक-सामाजिक स्थरातील मुलांमध्ये ऑटीझम आढळतो. 

निदान

  1. तस पाहायला गेलं तर ऑटिझमचे निदान वयाच्या दुसऱ्या वर्षीच केले जाऊ शकते तरीही बहुतेक मुलांचे निदान वयाच्या चौथ्या वर्षानंतर होते.
  2. MCHAT R/F स्क्रीनिंगने मुलाला ऑटिझमची रिस्क आहे का ते लवकर कळते. १६ ते ३० महिने वयोगटाच्या प्रत्येक मुलाची MCHAT R/F स्क्रीनिंग टेस्ट करणे आवश्यक असल्याचे अमेरिकन तसेच भारतीय बालरोगतज्ञ संघटनेचे मत आहे. 
  3. आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं कि, ऑटीजमची सगळीच लक्षणे एकाच मुलामध्ये दिसणार नाहीत. पण निदान करताना गरजेचे आहे की काही लक्षणं त्या मुलामध्ये एकत्रितरीत्या असली पाहिजे.
  4. आपले बालरोगतज्ञ/ developmental pediatrician पालकांकडून मिळालेली माहिती आणि मुलांच्या वागणुकीतली निरीक्षणे यातूनच निदान निश्चिती करू शकतात ज्याला DSM 5 criteria असे म्हटले जाते.

उपचार

आपल्याला जरी ऑटिझमची कारणे माहीत नसली तरी जलद निदान आणि उपचार ही मुलांच्या चांगल्या भवितव्याची गुरुकिल्ली आहे हे मात्र निश्चित आहे . Developmental आणि Behaviaral म्हणजे विकासात्मक आणि वर्तनात्मक पद्धतींचा वापर जर लवकरात लवकर मिळणाऱ्या उपचार सेवेमध्ये समाविष्ट केला तर सामाजिक संभाषण संवाद कौशल्य यांच्यामध्ये नक्कीच सुधारणा होऊ शकते. 

जर तुम्हाला ऑटिझम, डाउन सिंड्रोम, ADHD किंवा इतर बौद्धिक अपंगत्वांबाबत काही शंका असतील,
किंवा एखाद्या मुलाच्या विकासात उशीर होतोय असं वाटत असेल,  तर नई दिशा टीम तुमच्या मदतीसाठी आहे.कुठल्याही प्रश्नांसाठी किंवा मार्गदर्शनासाठी,  कृपया आमच्या मोफत हेल्पलाइन क्रमांकावर – 844-844-8996  कॉल किंवा व्हॉट्सॲप करा.

आमचे समुपदेशक हिंदी, मराठी, इंग्रजी, मल्याळम, गुजराती, तेलुगू आणि बंगाली भाषांमध्ये उपलब्ध आहेत

Tags:
Write Blog

Share your experiences with others like you!

English