Skip to main content

ऑटिझमबद्दलचे गैरसमज दूर करूया

Default Avatar
Dr Ajay Sharma
Also available in: हिंदी English
Like Icon 0Likes

Key Takeaways:

  1. ऑटिझमबद्दल चुकीची माहिती खूप पसरलेली आहे. खरी माहिती समजल्यास पालक चांगले निर्णय घेऊ शकतात व मुलासाठी योग्य मदत मिळवू शकतात. 
  2. जागरूकता वाढल्यास स्वीकार वाढतो आणि आपल्याला अधिक समावेशक समाज तयार करता येतो. 
  3. प्रत्येक मुलामध्ये काही ना काही विशेष गुण असतात. त्यामुळे त्यांची गरज लक्षात घेऊन, त्यांना योग्य ती साथ देणे गरजेचे आहे. 
  4. लवकर लक्ष दिल्यास आणि योग्य निर्णय घेतल्यास मुलाच्या विकासावर चांगला परिणाम होतो. 
  5. पालकांसाठी मदतीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत, जसे की नई दिशाचा मोफत हेल्पलाईन नंबर, जो माहिती व मार्गदर्शनासाठी उपयुक्त आहे. 

ऑटिझम म्हणजे काय?

ऑटिझम ही एक न्यूरोडेव्हलपमेंटल (मेंदूच्या विकासाशी संबंधित) स्थिती आहे. ही स्थिती व्यक्तीच्या संवाद साधण्याच्या पद्धतीवर, गोष्टी समजून घेण्यावर, आणि आजूबाजूच्या जगाशी कसं वागावं यावर परिणाम करते.“स्पेक्ट्रम” हा शब्द खूप महत्त्वाचा आहे — याचा अर्थ प्रत्येक मुलात वेगवेगळे लक्षणं, क्षमता आणि गरजा असू शकतात.ऑटिझम म्हणजे जगण्याची, विचार करण्याची वेगळी आणि भावना व्यक्त करण्याची शैली आहे.
बऱ्याच वेळा ऑटिझम असलेल्या व्यक्तींना आवाज, प्रकाश, कपड्यांचा टेक्सचर किंवा गर्दी अशा गोष्टी जास्त तीव्रतेने जाणवतात.
काही मुलांना एकच दिनक्रम (routine) आवडतो, काहींना बोललेलं समजायला थोडा वेळ लागतो, तर काही मुलं हावभाव, चित्रं किंवा असिस्टिव्ह टेक्नॉलॉजीच्या मदतीने संवाद साधतात. ऑटिझम असलेल्या अनेक लोकांना आवाज, प्रकाश, पोत किंवा सामाजिक वातावरणाबद्दल वाढलेली संवेदनशीलता अनुभवायला मिळते. इतरांना दिनचर्या पसंत असू शकते, बोलल्या

जाणाऱ्या भाषेवर प्रक्रिया करण्यासाठी अधिक वेळ लागतो किंवा हावभाव, चित्रे किंवा सहाय्यक तंत्रज्ञानाद्वारे संवाद साधता येतो.

मुलांमध्ये ऑटिझमची चिन्हे

  • डोळ्याला डोळा मिळवायला अडचण (आय कॉनटॅक्ट)
  • भाषेच्या विकासात विलंब होऊ शकतो
  • मित्र मैत्रिणी बनवण्यात किंवा नातेसंबंध टिकवण्यात अडचण
  • एकाच गोष्टीची वारंवार हालचाल किंवा सवयी (repetitive behavior)

जर एखादं मूल इतर मुलांसारखं बोलत नसेल किंवा प्रतिसाद देत नसेल, याचा अर्थ असा नाही की त्याला काही समजत नाही किंवा तो/ती भावना व्यक्त करत नाही.

बरीच मुलं शब्दांऐवजी इशाऱ्यांनी, हावभावांनी, किंवा इतर पर्यायी पद्धतींनी स्वतःला व्यक्त करतात — त्यांना योग्य साधनं मिळाल्यास तेही प्रगती करू शकतात.

लवकर समज व योग्य आधार का महत्त्वाचा आहे?

ऑटिझमची लक्षणं लवकर ओळखली, तर पालकांना योग्य वेळेवर मदत व सेवा मिळवता येतात.
पण हे लक्षात ठेवा , शिकण्याचं ठराविक वय नसतं. प्रत्येक मूल आपल्या गतीने शिकतं आणि कोणत्याही वयात प्रगती शक्य असते.

आपल्या मुलाला “सामान्य” बनवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी,  आपण असा समावेशक आणि समजूतदार परिसर तयार केला पाहिजे, जिथे त्याच्या खास गरजांचा सन्मान केला जातो.
थेरपी (उपचारपद्धती) ही फक्त शिस्त लावणारी नसून संवाद, संबंध आणि स्वीकृती वाढवणारी असावी.

ऑटिझम विषयीचे गैरसमज – समजून घेऊया आणि दूर करूया

आजही, ऑटिझम विषयी अनेक चुकीच्या कल्पना समाजात पसरलेल्या आहेत.

या गैरसमजांमुळे पालक गोंधळात पडतात आणि मुलांच्या गरजांबद्दल चुकीचं समज बनतं.

पण या चुकीच्या कल्पना कोणाच्या चुकीमुळे नाही, तर अनेकदा माहितीच्या अभावामुळेच तयार होतात

1. गैरसमज: ऑटिझम चुकीच्या पालकत्त्वामुळे होतो.
सत्य: ऑटिझम हे पालक कसे वाढवतात यामुळे होत नाही.
संशोधन सांगतं की ही स्थिती मेंदूच्या विकासाशी संबंधित आहे – विशेषतः लहान वयात मेंदूमध्ये कनेक्शन तयार होतात, त्यात काही वेगळेपणा असतो.
हे एका न्यूरोडेव्हलपमेंटल स्थितीमुळे होतं, वाढीच्या पद्धतीमुळे नाही.

2. गैरसमज: ऑटिझम असलेल्या मुलांना संवाद करताना अडचण होते म्हणजे ते बुद्धिमान नाहीत.
सत्य: संवाद करण्याची अडचण म्हणजे बुद्धिमत्तेचा अभाव नाही.
खूप वेळा या मुलांमध्ये जग समजून घेण्याची खास शैली असते ,जी आपल्यासारखी नसेल, पण ती देखील समजून घेण्यासारखी असते.
बुद्धिमत्ता अनेक प्रकारांनी दिसून येते आणि पारंपरिक चाचण्या त्यांचं संपूर्ण कौशल्य दाखवत नाहीत

3. गैरसमज: ऑटिझम असलेली मुलं एकटी राहायला पसंत करतात, त्यांना मित्र नको असतात.
सत्य: ही मुलं मैत्री किंवा जवळीक वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात. अनेक ऑटिस्टिक मुले मैत्री आणि सामाजिक संवादाला खूप महत्त्व देतात, जरी ते नेहमीच सामान्य किंवा अपेक्षित नसलेल्या मार्गांनी सहभागी असले तरीही.त्यांना ही नाती महत्त्वाची वाटतात — फक्त त्यांची जोडायची पद्धत वेगळी असते.

हे सादरीकरण तुम्हाला मुलांमध्ये ऑटिझमबद्दलच्या अशा अधिक मिथकांना शिकण्यास आणि दूर करण्यास मदत करेल.

ऑटिझमबद्दल गैरसमज का टिकून आहेत?

  •  माध्यमांमध्ये चुकीचं/एकसंध चित्रण
    सिनेमे, मालिका किंवा बातम्या यामध्ये ऑटिझमचं एकच रूप दाखवलं जातं.
    पण प्रत्यक्ष जीवन वेगळं असतं – काही मुलं कलाकार असतात, काही शांत, काही बोलकी, काहींना रचना आवडते, तर काहींना त्यात अडचण वाटते.
    हे सगळे अनुभव वैध आहेत आणि समजून घेण्यासारखे आहेत.
  •  जुनी वैद्यकीय भाषा
    पूर्वी डॉक्टर ऑटिझमचा उल्लेख “कमतरता” म्हणून करत असत – “high-functioning” किंवा “low-functioning” अशा शब्दांनी.
    हे शब्द आता कालबाह्य झाले आहेत, कारण ते मुलांच्या खऱ्या गरजा सांगत नाहीत.

 त्याऐवजी विचारूया – “या मुलाला वाढायला, शिकायला काय मदत हवी आहे?
हे दृष्टीकोन मुलाच्या गरजांवर आधारित असतो, केवळ “सामान्यतेच्या मापदंडांवर” नव्हे.

  • ऑटिझम असलेल्या व्यक्तींच्या अनुभवांना जागा नाही
    पालक व तज्ज्ञ अनेकदा माहिती मिळवतात, पण ऑटिझम असलेल्या व्यक्तींचं स्वतःचं म्हणणं फार कमी ऐकायला मिळतं.
    त्यांचे अनुभव ऐकले, तर आपली समज अधिक खरी, माणुसकीपूर्ण आणि उपयोगी होईल.

    जास्त माहिती मिळाल्यास, पालक म्हणून आपण अधिक सक्षम होतो – आणि आपल्या मुलासाठी एक समजूतदार, आधारभूत आणि प्रेमळ वातावरण तयार करू शकतो.

आपल्या मुलाला ऑटिझमचा निदान मिळाल्यावर अनेक प्रकारच्या भावना मनात येऊ शकतात – दिलासा, गोंधळ, दु:ख किंवा चिंता.
या सगळ्या भावना नैसर्गिक आहेत… आणि योग्यही आहेत.

पण या टप्प्यावर एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे –
  ‘मुलात काय कमी आहे?’ यावरून लक्ष हटवून,
‘माझं मूल कसं समजून घ्यायला हवं आणि त्याला कुठल्या गोष्टींनी मदत होईल?’ याकडे लक्ष देणं. शिकणं, ऐकणं आणि समाजाच्या “परिपूर्णतेच्या” कल्पनांपासून थोडं मोकळं होणं – हे सुरूवात करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

आपल्या मुलाचं वागणं, शिकण्याची पद्धत, संवाद करण्याची शैली – ही सगळी त्याची खास ओळख आहे.

याला समजून घेण्यासाठी तुम्ही जितकी माहिती मिळवाल, तितकी तुम्हाला त्याच्या गरजा समजण्यास सोपी वाटेल.

कृतज्ञता: या सादरीकरणातील स्लाईड १९ ते २५ साठी जय वकील फाउंडेशन यांचे आम्ही आभार मानतो.

काही प्रश्न आहेत का? ऑटिझम, डाऊन सिंड्रोम, ADHD किंवा इतर विकासात्मक बाबींबाबत काही शंका असतील तर,
नयी दिशा टीम आपल्या सोबत आहे!

आमचा मोफत हेल्पलाइन नंबर: 844-844-8996 कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅप द्वारे संपर्क करा)

आमचे समुपदेशक अनेक भाषा बोलतात – इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, मल्याळम, तेलगू आणि बंगाली ही माहिती मार्गदर्शनासाठी आहे. कृपया वैयक्तिक सल्ल्यासाठी पात्र व्यावसायिकांचा सल्ला घ्या.

Tags:
Write Blog

Share your experiences with others like you!

No Related Resources Found.

No Related Services Found.
English